हृदयद्रावक : विजेचा शॉक लागून बालकाचा दुर्दैवी मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील सुरगाणा तालुक्यात असलेल्या भदरगाव येथे राहणाऱ्या आठ वर्षीय बालकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

हितेश माधव वाघ असे या बालकाचे नाव आहे. रविवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास हितेश आपल्या घराजवळ मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी घराच्या शेजारी असलेल्या विजेच्या खांबाचा हितेशला धक्का लागला. विजेच्या अतिदाबाने लागलेल्या शॉकमुळे हितेश बेशुद्ध झाला. हा प्रकार घरातील लोकांच्या लक्षात येताच तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.