नाशिक (प्रतिनिधी): बसस्थानकात पायी जाणाऱ्या वृद्धेला सोन्याचे बिस्कीट पडल्याचे सांगून भुरळ पाडत तिची ९५ हजारांची सोन्याची पोत चाेरट्यांनी लांबवली. सीबीएसमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि जयवंताबाई लहामगे (रा. सिडको) यांच्या तक्रारीनुसार दुपारी बसमधून उतरून सीबीएसमधून पायी जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी आवाज दिला आजी तुमचे सोन्याचे बिस्कीट पडले असे सांगितले. बोलण्याच्या नादात भुरळ पाडून गळ्यातील मंगळसूत्र काढून देण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार दिली.
सोन्याचे बिस्कीट पडल्याचे सांगून वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले
2 years ago