शहरात मध्यरात्रीपासून जमाव, संचार आणि नाकेबंदी सुरू

नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोमवारी (दि. २८) मध्यरात्रीपासून जमाव आणि संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. याबाबतचे ८ जून रोजी काढलेले आदेश रद्द केले असून २८ जून रोजी रात्री १२ ते २७ जुलैपर्यंत शहर व परिसरात संचार आणि जमावबंदी लागू केली अाहे. शिवाय सायंकाळी ५ ते पहाटे ५ या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पहाटे ५ ते सायंकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू राहील. या कालावधीत ५ पेक्षा अधिक व्यक्तींना केवळ वैद्यकीय काम वगळता घराबाहेर पडण्यास मनाई असेल. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर येत असल्यास तसे ठोस कागदपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असले. बाजारपेठेत जाण्यासाठी पालिकेने नागरिकांना मोफत पास देण्याची व्यवस्था करण्याचे आदेशात म्हटले आहे. हा पास एक तासासाठीच द्यावा, असे अादेशात म्हटले अाहे.