विसर्जनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना!

नाशिक (प्रतिनिधी) : सार्वजनिक गणेशविसर्जनाच्या अनुषंगाने शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी आणि गणेशविसर्जन पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज (दि.२६) जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आढावा घेतला.

सदर बैठकीत गणेश मूर्ती शाडू मतीची असल्यास विसर्जन घरीच करावे,  विसर्जन घरी शक्य नसल्यास जवळील विसर्जन स्थळीं करावे,  विसर्जन मिरवणुका काढू नये पारंपरिक पद्धतीने विसर्जन स्थळावर आरती न करता घरीच आरती करावी,  विसर्जन स्थळीं गर्दी करणे टाळावे, लहान मुले तसेच वरिष्ठांनी सुरक्षेच्या दृष्टीने जाणे टाळावे. चाळीतील अथवा इमारतींतील घरगुती गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक काढू नये. विसर्जनस्थळावर मुर्ती संकलन केंद्रांवर मुर्ती दान करावी.  विसर्जनावेळी सामजिक भावना दुखावतील अशा प्रकारे पोस्ट सोशल मीडिया वर टाकु नये. सार्वजनिक गणेशोत्सव २०२० विसर्जनाच्या अनुषंगाने शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सार्वजानिक मंडळानी आणि स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करण्यावर भर द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीत दिल्या.