जिल्ह्यात आजपर्यंत २६ हजार ५९६ रुग्ण कोरोनामुक्त; ५ हजार ६५८ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २६ हजार ५९६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ५ हजार ६५८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २९२, चांदवड ३८, सिन्नर २३०, दिंडोरी ६२, निफाड ३३८, देवळा ४३,  नांदगांव १५५, येवला ५१, त्र्यंबकेश्वर १४, सुरगाणा ००, पेठ ०२, कळवण ११,  बागलाण १७५, इगतपुरी १०५, मालेगांव ग्रामीण १३३ असे एकूण १ हजार ७१५  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २३०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ७१०  तर जिल्ह्याबाहेरील ०३ असे एकूण ५ हजार ६५८  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३३ हजार ०८८  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७६.१६,  टक्के, नाशिक शहरात ८३.४१ टक्के, मालेगाव मध्ये  ६५.९२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८७.५०  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८०.३८ इतके आहे.

कोरोनामुळे आजपर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २३३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४७०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १०८ व जिल्हा बाहेरील २३ अशा एकूण ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: हायवेला ढाब्यांवर दारू रिचविणाऱ्यांची आता काही खैर नाही !

(वरील आकडेवारी आज दि. २८ ऑगस्ट सकाळी ११.३० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790