विनामास्क फिरणाऱ्या ११३ जणांकडून सिडकोत २२ हजारांवर दंड वसूली…

नाशिक (प्रतिनिधी) :  शहरातील सिडको परिसरात सोमवारी (दि.१२) रोजी महापालिका घनकचरा व्यवस्थापन सिडको विभागातर्फे मास्क विना फिरणाऱ्या ११३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सुमारे २२ हजार ६०० रुपयांचा दंड देखील वसुल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना‌ रूग्णसंख्या वाढत असल्याने, महापालिकेकडून मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येत आहे. १५ जून ते ११ ऑक्टोबर या कालावधीत ६१७ जणांवर कारवाई करून १लाख २३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ११ जणांकडून ११ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर मोहीम विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील व अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.