लॉज मिळवून देण्याच्या नावाखाली राजस्थान येथील पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना अटक

लॉज मिळवून देण्याच्या नावाखाली राजस्थान येथील पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक रोडला परिवार हॉटेल जवळ लॉज मिळवून देण्याच्या नावाखाली राजस्थान येथील पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. नदीम सलीम बेग (वय २२, विहीतगाव, दीपक अशोक पताडे (वय १९) शुभम दिलीप घोटेकर (वय १८ दोघेही विहीतगाव) अशी संशयितांची नावे आहेत.

शुक्रवारी (ता.२०) रात्री साडे नउच्या सुमारास परिवार हॉटेल समोर लॉजच्या शोधात असलेल्या राजस्थान येथील संतोषकुमार अर्जुनलाल मिना (वय २६, बसवा, जि.दौसा ) यांना संशयित नदीम बेग याने गाठले व त्यांना लॉज मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याला दुचाकी (एमएच १५ सीई ४५१९) हिच्यावर बसवून विहीतगावला विठ्ठल मंदीर परिसरात नेले तेथे जीवे मारण्याची धमकी देत, त्याच्या खिशातून पाकीट जबरदस्तीने काढून घेत, शिवीगाळ केली.तसेच रोख २२०० रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली आहे.
इथे किरणा मालावर मिळतेय ४० टक्क्यांपर्यंतची सूट.. ऑफर रविवार पर्यंतच (दि. २२ ऑगस्ट) मर्यादित
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरातील या भागात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) पाणी पुरवठा नाही
नाशिकरोड: आत्यासह भाच्याची रेल्वेखाली आ’त्मह’त्या