मास्क न वापरणाऱ्यांना आता दोनशे रुपयांचा दंड

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मास्क न वापरता फिरणाऱ्यांना याआधी एक हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात दंड भरण्यास नागरिकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे अखेर मनपा आयुक्तांनी दंडाच्या रकमेत घट केली असून पुन्हा दोनशे रुपये दंड आकारणीचे सुधारित आदेश काढले आहेत.

सुरुवातीला मनपा आयुक्तांनी दंडाची रक्कम कमी करण्यास नकार दिला होता. मात्र आता आयुक्तांनी सुधारित आदेश जरी केले आहेत. त्यामुळे आता मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना पूर्वीप्रमाणेच दोनशे रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.