बाल्कनीतून प्रवेश करत तब्बल १५ तोळे सोन्याची चोरी…

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील जेलरोड भागात बंद फ्लॅटच्या बाल्कनीतून आत शिरून तब्बल १५ तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे.

जेलरोड भागातील पंचक येथील ड्रीमवास्तू हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या किरण भिकन गाडवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या आई, वडील पत्नी आणि मुलांसोबत गुरुवारी ठाण्याला लग्नासाठी निघाले होते. याचाच गैरफायदा घेत चोरट्याने फ्लॅटच्या बालकनीतून आत प्रवेश करून घरात असलेले सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपये चोरी करून नेले.