बांगलादेशी तरुणीला वाममार्गाला लावल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

नाशिक (प्रतिनिधी): बांगलादेशी तरुणीला नाशिकमध्ये आणून वाममार्गाला लावल्याच्या गुन्ह्यातील आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
१३ डिसेंबर २०१७ रोजी भद्रकाली पोलिसात बांगलादेशी तरुणीला नाशिकमध्ये आणून तिला वाममार्गाला लावण्याचा पिटा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात विशाल गंगावणेसह पाच जणांना अटक झाली हाेती. तपासी अधिकाऱ्यांनी गंगावणेसह, नानी गंगावणे, सोनू गंगावणे व इतर दोघांवर कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती नायर यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अविनाश भिडे व अ‍ॅड. राहुल कासलीवाल यांनी काम पाहिले.