पोलीस आयुक्तालय परिसरात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 09 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये शस्त्र व आदेश जारी  केला आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे विशेष शाखा पोलीस उपआयुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी शासकीय मनाई आदेशान्वये कळविले आहे.