पेटीएमचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला हजारो रुपयांचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): पेटीएम केवायसी एक्स्पायर झाले आहे ते अपडेट करावे लागेल असं सांगून चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ६९००० रुपयांचा गंडा घातला आहे. फिर्यादीच्या बँक खात्यातून परस्पर ही रक्कम लंपास करण्यात आली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला फोन करून सांगितले कि तुमचे पेटीएम केवायसी एक्स्पायर झाले आहे त्याला अपडेट करावे लागेल.

असे म्हणत क्विक सपोर्ट ऍप डाऊनलोड करायला लावले. ते करताच चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा घेतला आणि त्यांच्या खात्यातून तब्बल ६९००० रुपये लांबवले.