नाशिक: शिवशाही बस उड्डाणपुलाच्या पोलवर आदळून अपघात; एकाचा मृत्यू- तीन जखमी

नाशिक: शिवशाही बस उड्डाणपुलाच्या पोलवर आदळून अपघात; एकाचा मृत्यू- सहा जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बसचा आणि मोटार सायकलचा अपघात झाला आहे.

या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला आहे तर बस मधील 3 जण जखमी झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, आज दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवशाही बस नाशिकहून औरंगाबादकडे निघाली होती.

या दरम्यान औरंगाबाद नाक्यावर बस आली असता बस उड्डाण पुलाखालील पोल नंबर 44 वर आदळली. बसला जोरदार धक्का बसल्याने  बसमधील सर्व  प्रवाशी एकमेकांवर आदळले. यात बस मधील तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. तर या अपघातात रस्त्यावरील एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत दुचाकीस्वाराची ओळख अजून पटलेली नाही.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
BREAKING: नाशिक: SMBT कॉलेजच्या बसला अपघात; २५ हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी