नाशिक मधील काही भागात निर्बंध लावण्याची तयारी सुरु..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. पालकमंत्र्यांकडून लॉकडाउन बाबत तूर्तास तरी नकार दिला असला तरी, मात्र मेन रोड परिसरातील काही भागात कडक निर्बंध लावण्यासाठीची तयारी दिसून येत आहे.

बाजारपेठ परिसरातील रेडक्रॉस धुमाळ पॉईंट भागात पोलिसांनी तंबू टाकले आहेत, तर रस्त्यावर बांबूच्या सहाय्याने रस्ते बंद केले जात असल्याचे चित्र आहे.

तर काही ठिकाणी बॅरिगेटिंग केली जात आहे, नेमकी ही तयारी कशासाठी…याबद्दल सध्या शहरात तर्क वितर्क लावले जात आहेत …त्यामूळे येत्या काळात मुख्यमंत्री काय आदेश देतात याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे.