नाशिकला हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना डांबून ठेवत मारहाण

नाशिक (प्रतिनिधी):   नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये इंटर्नशिप करत असलेल्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना डांबून ठेवत मारहाण करण्यात आली. दरम्यान, या युवक-युवतींची सुटका सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांनी केली आहे.

इंदिरानगर परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सहा तरुण आणि पाच तरुणी आल्या होत्या. हॉटेल प्रशासनाने दम भरत इथून तुम्हाला प्रशिक्षण सोडून घरी जाता येणार नाही, असे सांगत मारहाण करत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि इंदिरानगर पोलिसांनी धाव घेत डांबून ठेवलेल्या उत्तर प्रदेशस्थित युवक – युवतींना सुरक्षित बाहेर काढले. त्यांना पोलीस वाहनाने नाशिकरोड रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यात आले आहे.