यंदाचा जनस्थान पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर

नाशिक (प्रतिनिधी) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी प्रतिष्ठेचा जनस्थान सन्मान प्रदान करण्यात येतो. त्यानुसार, यंदाचा प्रतिष्ठेचा जनस्थान जाहीर करण्यात आला असून, नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक हे या सन्मानाचे मानकरी आहेत.

येत्या १० मार्च २०२१ रोजी हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. असे निवड समितीचे अध्यक्ष ॲड. विलास लोणारे यांनी सांगितले. तसेच कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या प्रतिष्ठेच्या सन्मानाचे स्वरूप एक लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. यंदा पुरस्काराचे सोळावे वर्ष आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटवणाऱ्या मराठी भाषेत गौरवास्पद लेखन करणाऱ्या साहित्यिकास हा पुरस्कार दिला जातो.

दरवर्षी कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार दिला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे  हा पुरस्कार १० मार्च रोजी देण्यात येणार आहे.