NC

नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वीच गमे यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यामुळे नाशिकमध्ये वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग ही आता चिंतेची बाब ठरत आहे. गुरुवारी नाशिकमध्ये २०५ कोरोना रुग्ण आढळून आले होते तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंद दी चादर कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास दाखविला हिरवा झेंडा
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790