दोघा मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : सिन्नर-शिर्डी महामार्गावर असलेल्या पांगरी शिवारानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त डंपरवर भरधाव दुचाकी पाठीमागून धडकल्याने दुचाकीवर स्वार दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. निलेश पवार (२२) आणि अभिषेक पांगारकर (२२) अशी दोघांची नावे आहेत.

मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हे दोघे मित्र पल्सरवरून वावीच्या दिशेने जात होते. त्यावेळी सिन्नर-शिर्डी महामार्गावर रस्त्याच्या कडेला एक नादुरुस्त डम्पर उभा होता. त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी पाठीमागून डंपरवर धडकली. यात दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांन उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू