दहावी-बारावीचा पेपर पॅटर्न बदलणार; अभ्यासक्रमातही कपात!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढताप्रादुर्भाव बघता देशतील शाळा आणि महाविद्यालये अद्याप बंदच आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून २०२१ मध्ये होणार्या दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे.

सीबीएसई बोर्डाने अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. तसेच प्रश्नपत्रिकेमध्ये बहुपर्यायी प्रशांना म्हणजेच MCQ प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनासुद्धा दिलासा मिळाला आहे.