तिसरीचा ऑनलाईन वर्ग सुरु असतांना मुख्याध्यापकानेच टाकले अश्लील फोटो!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ०१ च्या मुख्याध्यापकाने ग्रुपवर अश्लील फोटो टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या मुख्याध्यापकाने इयत्ता तिसरीच्या वर्गाच्या व्हाट्सअँप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जिल्हा परिषद शाळा क्र.०१ चे मुख्याध्यापक युवराज नंदन यांनी ऑनलाईन वर्ग सुरु असतांना शाळेच्या ग्रुपवर अश्लील फोटो पाठवले. युवराज नंदन यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी पालकांनी शिक्षणाधिकाऱ्याना केली. त्यानंतर हे प्रकरण दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र दिवाळीनंतर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती आहे.