डंपरच्या धडकेने महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील इंदिरानगर परिसरातील पाथर्डीगाव ते पाथर्डीफाटा दरम्यानच्या रस्त्यावर एका भरधाव डंपरने दुचाकीस्वारला धडक दिली. दरम्यान, अपघातात दुचाकीस्वार अजय सारसर या महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

अजय सुभाष सारसर (वय, २९ रा.गोपालवाडी,वडाळागाव) हे शुक्रवारी (दि.४) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पाथर्डीफाटा रस्त्याकडे दुचाकीवरून (क्र.एमएच १५ डीएफ ७८०९) जात होते. दरम्यान भरधाव असलेल्या एका डंपरने (क्र.एमएच १५ एफव्ही ८००१) अजय यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातावेळी सारसर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

या अपघाताचा इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी डंपर चालकास, डंपरसह ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत, या रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्यासाठी दुभाजक बांधण्याची मागणी केली.