झोळीतून पडल्याने बालकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): महाराणा प्रताप चौकात राहणारे हशरार शेख हे सातपूर येथील एका खाजगी कंपनीत कर्मचारी होते. ते आपल्या कुटुंबासोबत वर्ष भराच्या मुलाला कामावर घेऊन गेले होते. या वेळी त्यांनी चिमुकल्याला तेथे एका झोळीत टाकले होते. त्यावेळी अचानक त्यांचा मुलगा हर्ष झोळीतून खाली पडला. त्याच्या डोक्यास टेबलचा जबर मार लागून गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी खाजगी रूग्णायात दाखले केली असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.