नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील इंदिरा नगर परिसरात मच्छिन्द्रनाथ ट्रस्ट ‘बडे बाबा’ नावाने आश्रम स्थापन करून आश्रम चालवले जात होते यातील बाबा संशयित आरोपी श्री १००८ महंत गणेश आनंद गिरी महाराज उर्फ गणेश जयराम जगताप याने सातपूर परिसरात राहणारे पुखराज दीपाजी चौधरी (४८) याना जमिनीतून सोने काढून देतो असे आमिष दाखून १ लाख १२ हजार ६०० रुपयाची फसवणूक केली.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या तक्रारीवरून भोंदू बाबा गणेश जगताप याच्या विरोधात फसवणुकीचं गुन्हा दाखले केला असून बडे बाबा आश्रमातून संशियत आरोपी भोंदू बाबा फरार आहे. जानेवारी २०१९ ते आता पर्यंत आश्रमाच्या कामासाठी चौधरी यांच्याकडून १ लाख १२ हजार ६०० रुपये उकळले असून आश्रमाच्या कामासाठी अजून किती भाविकांना चुना लावला आहे , याचा तपास पोलीस करत आहेत.
फसवणूक झाली म्हणून चौधरी यांनी पोलिसात धाव घेतली असल्याची कानकूच खबर लागताच भोंदू बाबा आश्रमातून फरार झाला अशी माहिती तपास अधिकारी एस के काळे यांनी दिली. पोलिसांचे पथक भोंदू बाबाच्या शोधात असून लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे सांगण्यात आले आहे. सदर भोंदूबाबा कडून ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात तक्रार दयावी असे आव्हान काळे यांनी केले आहे .