जुन्या नाशकातील पोपडादेवी यात्रोत्सव रद्द!

नाशिक (प्रतिनिधी) : दरवर्षी नवरात्रीच्या अष्टमीला जुन्या नाशकात असलेल्या डिंगरअळी परिसरात पोपडादेवी यात्रोत्सव साजरा केला जातो. यामध्ये वाड्याच्या भिंतीला पोपडादेवी प्रकट होत असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर यात्रोत्सावांबरोबरच पोपडादेवी यात्रोत्सव सुद्धा रद्द करण्यात आला आहे.

नाशिकच नव्हे तर वेगवेगळ्या भागातून भाविक पोपडादेवी यात्रीत्सावासाठी येत असतात. सप्तमीच्या रात्रीपासूनच याठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. यावर्षी मात्र हा यात्रोत्सव रद्द झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.