जिल्ह्यात आजपर्यंत ८२ हजार ५०८ रुग्ण कोरोनामुक्त; ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८२  हजार ५०८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ८० ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत १ हजार ६२४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत शुक्रवारी (दि. २३ फेब्रुवारी) पाणीपुरवठा बंद राहणार !

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३१८, चांदवड १४३,सिन्नर ५८६,दिंडोरी ३२२, निफाड ३९३, देवळा ३२,  नांदगांव ३०८, येवला ११८, त्र्यंबकेश्वर ११८, सुरगाणा १७, पेठ १५, कळवण १२०,  बागलाण १६१, इगतपुरी १५३, मालेगांव ग्रामीण १७४   असे एकूण २  हजार ९७८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३  हजार १८३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १४७  तर जिल्ह्याबाहेरील १३२  असे एकूण ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ९० हजार ५७२ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक:  घरूनच टपाली मतदानाची 80 वर्षांवरील मतदारांना सुविधा !

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८६.१९,  टक्के, नाशिक शहरात ९३.२९  टक्के, मालेगाव मध्ये  ९२.३३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५.४४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.१०  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ५७७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ८४६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६५  व जिल्हा बाहेरील ३६  अशा एकूण १ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: रामकुंडावरील वस्त्रांतरगृह महापालिका घेणार ताब्यात; बंदोबस्ताची मागणी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790