गोदावरी एक्सप्रेससह पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची चाकरमान्यांची मागणी….

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या १० महिन्यांपासून रेल्वेसेवा बंद असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्याच्या अंतर्गत प्रवासासाठी उपयुक्त असणाऱ्या पॅसेंजर गाड्या आणि रोजच्या अपडाऊन साठी गोदावरी एक्स्प्रेस सुरु करावी अशी मागणी चाकार्माण्यांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्यात याव्या अशी मागणी केली जात आहे. अनलॉक टप्प्यात जवळजवळ सगळ्याच गोष्टी आता सुरळीत सुरु झाल्या आहेत मात्र रेल्वेसेवा अजून पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सुपरफास्ट गाड्यांचे शुल्क अधिक असल्याने त्या सर्वसामान्यांना परवडत नाहीत. म्हणून पॅसेंजर गाड्या सुरु करण्यात यावा अशी चाकरमान्यांची इच्छा आहे.