गोदाकाठी घाणीचे साम्राज्य; रोगराई पसरण्याचा धोका!

नाशिक (प्रतिनिधी) : दहा दिवसांच्या पाहुण्या गणपती बाप्पाला काल (दि.०१) नाशिककरांनी निरोप दिला. श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्या ऐवजी यंदा मूर्तीदान हा पर्याय नाशिककरांनी निवडला. प्रशासनाच्या वतीने मूर्ती संकलानाचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये अनेक नाशिककरांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. मात्र मूर्ती संकालानाप्रमाणेच निर्माल्यासाठीसुद्धा कलश ठेवण्यात आले होते. परंतु ते कलश भरून गेल्याने पर्याय उरला नाही म्हणून नागरिकांनी निर्माल्य खालीच टाकून दिले. म्हणून गोदाकाठी निर्माल्यासह कचऱ्याचे सुद्धा मोठे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे साम्राज्य निर्माण होऊन रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.