गाडी लावण्याच्या कारणावरून झाला वाद आणि चौघांनी मिळून…

नाशिक (प्रतिनिधी): गाडी लावण्यावून झालेल्या वादात चौघांनी मिळून एका इसमाला चौघांनी मिळून लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना गवळीवाडा, नाशिकरोड येथे घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीला मारहाण झाली ते जखमी झाल्यामुळे त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी विशाल सुरेश गवळी हे खोले मळा, गवळीवाडा (आर्टिलरी सेंटर रोड) येथे राहतात. त्यांचे भाऊ महेश सुरेश गवळी हे अहमदनगरहून चार चाकी गाडीने आई, वडील व पत्नी यांना घेऊन येथे आले. यावेळी त्यांच्याच ओळखीचे भागवत औशीकर, नाना औशीकर, आसराआप्पा झिपरे, सुभाष औशीकर यांनी गाडी लावण्याच्या कारणावरून कुरापत काढली. त्याचप्रमाणे गवळी यांचे भावाला आणि आई वडिलांना वाईट भाषेत शिवीगाळ कण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता भागवत औशीकर याने त्याच्याकडील लाकडी दांड्याने महेश यांना बेदम मारहाण केली अशी तक्रार विशाल गावली यांनी दिली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५३७/२०२०) दाखल करण्यात आला आहे.