गरज भासल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा….

नाशिक (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाशिकमधली धरणे भरू लागतात. परंतु या वर्षी तशी परिस्थिती नसल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर महानगराच्या पाणीपुरवठ्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. आवश्यकता असेल तसं एक वेळचाच पाणीपुरवठा करावा असे त्यांनी सांगितले.

वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आवश्यकता भासली तर महानगरात एकदाच पाणीपुरवठा करावा लागणार आहे. पाणीकपात करावी किवा काही बदल करायचे यासंदर्भातील निर्णय महापालिका प्रशासनानेच घ्यावा असेही भुजबळ यांनी सांगितले.