केबिनमधील वायरिंगमध्ये आग लागल्याने मालट्रक पेटला

नाशिक (प्रतिनिधी): रविवार (दिनांक ४ जुलै ) दुपारच्या सुमारास  अंबड एम आय. डी. सी. लेयर कंपनी समोरील रस्त्यावर मालट्रक केबिनला आग लागल्याचा प्रकार घडला आहे.. या मालट्रकच्या (क्रमांक MH ०४  डी एस ८०३८) केबिन मधील वायरिंग मध्ये बिघाड झाल्याने हि आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ही आग विझवण्यासाठी सिडको  अग्निशमक व अंबड  एम आय डी सी अग्निशमक केंद्राच्या अशा दोन गाड्या आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्या. त्यानंतर दोन्ही  बंबांनी मिळून ही आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमक केंद्राच्या गाड्या वेळीच आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या ठिकाणी आलेल्या सिडको अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात त्यांना यश आले. आग विझविण्यासाठी सिडको अग्निशमन केंद्राचे लिडिंग फायरमन आर. ए.लाड, फायरमन के के पवार, ए एस.सोनावणे, एस के शिंदे, एस बी गाडेकर, वाहन चालक इस्माईल काझी व एमआयडीसी अंबड फायरचे कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यास परिश्रम घेतले।