कुठलीही शहानिशा न करता आमच्यावर आरोप- अशोका मेडिकव्हर

नाशिक (प्रतिनिधी): गरजेपेक्षा जास्त रेमडेसीव्हीरचा साठा केल्याप्रकरणी काल (दि. १३ एप्रिल २०२१) जिल्हाधिकाऱ्यांनी अशोका मेडीकव्हरविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आपल्यावर झालेल्या आरोपांचा हॉस्पिटलने इन्कार केला आहे.

आमच्यावर कुठलीही शहानिशा न करता आरोप करण्यात आले. वितरकाकडे साठा उपलब्ध नसल्याने मेडिकव्हर हॉस्पिटलच्या देशातील १६ रुग्णांलयांतून हा साठा उपलब्ध केला. मेडिकव्हरच्या राज्यातील तीन रुग्णालयांसाठी हा साठा होता. हॉस्पिटलनने कायद्यानुसार रितसर कंपनीकडून ही खरेदी केली आहे. पालकमंत्र्यांनीही एफडीएकडे याबाबत विचारणा करत खात्री केली. रुग्णालय प्रशासनाने अधिकाऱ्यांना तपासासाठी सर्व कागदपत्रे दिली आहेत. परंतु, अधिकाऱ्यांच्या तपासाआधीच सत्यता न पडताळताच आरोप करण्यात आले. असे स्पष्टीकरण अशोका मेडिकव्हरचे सेंटर हेड रितेशकुमार यांनी दिले आहे.