किरकोळ कारणावरून सातपूर येथील १३ वर्षीय मुलीची आत्महत्या !

नाशिक (प्रतिनिधी) : वडिलांनी आजीच्या गावाला जाण्यासाठी पैसे दिले नाहीत. याचा राग येऊन, एका अल्पवयीन मुलीने थेट आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, उज्जवला एकनाथ गांगुर्डे (वय १३) हिने आजीच्या गावाला जाण्यासाठी वडील एकनाथ पांडुरंग गांगुर्डे यांच्याकडून पैसे मागितले. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग येऊन, उज्जवला हिने राहत्या घरी (महादेववाडी अंबिका स्वीटच्या मागे, सातपूर) लाकडाच्या आढ्याला ओढणी बांधून, गळफास घेतला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.