नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकरोड परिसरातील ग्रीन मिडोज येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला गुगल वरून वाईन मागवणं चांगलंच महागात पडलंय. सदर व्यक्तीने वाईन मागवण्यासाठी गुगल चा मार्ग अवलंबला. गुगल वर सर्च केल्यानंतर कॅपिटल वाईन्स ही साईट घरपोच वाईन पुरवते असे त्यांच्या लक्षात आले.
त्यावरून ऑर्डर केली असता सदर बॉटलची रक्कम भरण्यासाठी अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्या अनोळखी इसमाने फिर्यादीचे एच.डी.एफ.सी. बँकेचे अकाउंट हॅक करून वेळोवेळी पैसे काढून घेत एकूण १ लाख १८ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार लक्षात येताच फिर्यादीने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.