नाशिक (प्रतिनिधी) : शहरातल्या गंगापूर रस्त्यावर असलेल्या आकाशवाणी केंद्राजवळ भाजी बाजाराचा प्रश्न अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजी विक्रेते आणि महापालिका यांच्यात भाजी बाजार बंद ठेवण्यावरून वाद झाला होता. महापालिकेने हा भाजी बाजार पोलीस बळाच्या मदतीने बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विक्रेत्यांनी विरोध केल्याने पालिका यावर सुवर्णमध्य काढण्यास तयार झाली आहे.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये न्यायालयीन आदेशाचे पालन करूनच भाजी बाजार सुरु असणे गरजेचे आहे. म्हणून ते त्याच ठिकाणी ठेऊन वाहनतळासाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना भुजबळ यांनी महापालिकेला केली.