हे काय नवीन! व्हॉट्सअ‍ॅपने बंद केले ८५ लाख भारतीय अकाउंट्स, नेमकं प्रकरण काय?

मेटा कंपनीच्या WhatsApp या लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅपने सप्टेंबर महिन्यात भारतातील 85 लाखांहून अधिक वापरकर्त्यांची खाती बंद केली आहेत. 2021 च्या नवीन आयटी नियमांच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आलं असून, गैरवापर रोखण्यासाठी कंपनीने हे कठोर पाऊल उचलले आहे.

सप्टेंबर महिन्यात सादर करण्यात आलेल्या मासिक अहवालात, कंपनीने 16.58 लाख खाती स्वतःहून बंद केली असून, वापरकर्त्यांच्या कोणत्याही तक्रारीशिवाय हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या काळात WhatsApp ला 8,161 तक्रारी मिळाल्या, ज्यात केवळ 97 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर, तक्रार निवारण समितीच्या दोन आदेशांचेही कंपनीने पालन केले असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

2021 चे नवीन आयटी नियमआयटी नियम 2021 नुसार, भारतात 50,000 पेक्षा अधिक वापरकर्त्यांची संख्या असलेल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना मासिक अहवाल प्रकाशित करणे बंधनकारक आहे. या अहवालात वापरकर्त्यांकडून नोंदवलेली खाती, कंपनीने केलेली कारवाई आणि तक्रार निवारण समितीचे मार्गदर्शन या गोष्टींचा तपशील असतो.WhatsApp ने स्पष्ट केलं आहे की, वापरकर्त्यांना सुरक्षितता आणि पारदर्शकतेचं आश्वासन देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

कंपनीने सांगितलं की, वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपवर हानिकारक सामग्री आणि संपर्कांना थेट अ‍ॅपमधून ब्लॉक आणि रिपोर्ट करू शकतात. कंपनीने गैरसमज पसरविणे, सायबर सुरक्षेत सुधारणा करणे, आणि निवडणुकीतील पारदर्शकता कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा मतदान टक्केवारीचे 75+ उद्दिष्ट साध्य करूया - जिल्हाधिकारी

ऑगस्ट महिन्यातही WhatsApp ने सुमारे 84.58 लाख खाती बंद केली होती, ज्यात 16.61 लाख खाती स्वतःहून बंद करण्यात आली होती. आता वापरकर्त्यांना सुधारित फीचर्स मिळत असून, त्यात वैयक्तिक यादी बनविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे संपर्क आणि ग्रुप चॅट अधिक सोयीस्कर होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790