Live Updates: Operation Sindoor

WhatsApp वर वाढलाय आंतरराष्ट्रीय कॉल स्कॅम, नेमकं काय करतात हे स्कॅमर्स? कसा कराल बचाव?

WhatsApp messenger वर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल्समध्ये गेल्या काही आठवड्यांत मोठी वाढ झाली आहे. हे कॉल ऑडिओ आणि व्हिडिओ अशा दोन्ही प्रकारचे असतात. अनेकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून अचानक कॉल येत आहेत.

हे कॉल्स इथिओपिया (+251), मलेशिया (+60), इंडोनेशिया (+62), केनिया (+254), व्हिएतनाम (+84) आणि इतर यांसारख्या वेगवेगळ्या देशांचे आहेत. या स्पॅम कॉल्सच्या वाढलेल्या संख्येमुळे सरकारने देखील याची आता दखल घेतली आहे. व्हॉट्सॲपने देखील आपल्या बाजूने असे म्हटले आहे की, अशा घटना कमी करण्यासाठी ते आपल्या एआय आणि एमएल सिस्टमला अधिक स्ट्राँग बनवत आहेत. तसंच अशा नंबर्सना त्वरीत ब्लॉक करण्याचा सल्लाही त्यांनी दिलं आहे. सरकार आणि व्हॉट्सॲप आपापल्यापरीने प्रयत्न करत असताना, सामान्य ​व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनी देखील सावध राहणं महत्त्वाचं आहे.

​स्कॅमर्स मल्टीनॅशनल कंपन्यांचे HR असल्याचा करतात दावा:
स्कॅम करणारे हे अनेकदा स्वत:ला मल्टीनॅशनल कंपन्यांचे HR असल्याचे दाखवतात. तसंच समोरच्याला सांगून घरबसल्या नोकरी करता येईल आणि पैसे मिळवता येतील असं सांगतात. ज्यात सुरुवातीला साधी कामं देतात आणि पैसेही स्वत:कडून समोरच्यांना देतात. विशेष म्हणजे हे स्कॅमर त्यांच्या कॉल दरम्यान समोरच्याचा अगदी ब्रेनवॉश करतात. अगदी सोप्या कामांसाठी मोहक बक्षिसंही देतात. यामध्ये YouTube व्हिडिओ किंवा सोशल मीडिया पोस्ट लाइक करणं किंवा मित्रांना शेअर करणं यासारख्या सोप्या गोष्टींचा समावेश असतो, घोटाळेबाज सुरुवातीला ज्यांना गंडा घालणार आहे त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी पैसेही देतात.

असा होतो मग स्कॅम:
या स्कॅममधील पुढील पायरी म्हणजे युजरला दोन वेळा पैसे दिल्यानंतर, ते युजरला म्हणात, “तुम्हाला आणखी जास्त पैसे कमावचे असतील आणि अधिक कामं पूर्ण करायची असेल तर अधिक कामं पूर्ण कराली लागतील. ज्यानंतर जर युजरनं हो म्हटलं, तर ते त्यांना आणखी काही कामं देतात,पण यावेळी आणखी दुप्पट किंवा तिप्पट परतावा मिळविण्याच्या वचनासह थोड्या प्रमाणात गुंतवणूक करायला सांगतात आणि इथेच युजर्सना गुंडाळण्यास सुरुवात होते.

या आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरुन येतात कॉल:
WhatsApp वापरकर्त्यांना +254, +84, +63, +1(218) आणि असाच काही इंटरनॅसल नबंरवरुन हे कॉल्स येतात. या आंतरराष्ट्रीय नंबरवरून हे स्कॅम कॉल आणि मेसेजही प्राप्त होत असतात कॉल्समध्ये व्हिडीओ कॉलतसंच ऑडिओ कॉल्सचाही समावेश असतो. हे कॉल येणारे देश सध्यातरी व्हिएतनाम, केनिया, इथिओपिया आणि मलेशिया असे आहेत.

कसा कराल बचाव?:
फसवणूक होण्यापासून रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे या नंबरवरील मेसेज किंवा कॉलला प्रतिसाद देणे पूर्णपणे टाळा. तुम्हाला हे कॉल प्राप्त होताच त्यांना ब्लॉक करणे आणि रिपोर्ट करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. दरम्यान या आंतरराष्ट्रीय व्हिडिओ कॉल स्कॅममध्ये अडकणे टाळण्यासाठी, हे कॉल कधीही उचलू नका किंवा आंतरराष्ट्रीय नंबरवरून मिस्ड कॉल मिळाल्यावर परत कॉल करू नका.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790