“पोटदुखीच्या उपचारासाठी डॉ. एकनाथ शिंदेंना आणलं”; फडणवीसांचा विरोधकांना टोला

नाशिक (प्रतिनिधी): शासकीय कामांवर विरोधकांकडून टीका केल्या जात आहेत. त्यांचा चांगली काम केलंलं रुचत नाही. त्यांच्या पोटात दुखायला लागतं, त्यामुळं त्यांची पोटदुखी घालवण्यासाठी आम्ही डॉ. एकनाथ शिदेंना आणलं आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. नाशिक इथं ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

“कधीकधी चांगलं काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं, लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखतं, तरी काही लोक यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मग शासन आपल्यादारी कशा करता? लोकं जमा करता कशा करता? अरे लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात. तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय?, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना सवाल विचारला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

तसेच आता चिंता करु नका कोणाच्याही पोटात दुखलं तरी त्या पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉ. एकनाथ शिंदे आम्ही आणले आहेत. त्यांच्या पचनी पडलं नाही तरी अजितदादा आहेत. त्यामुळं आता सर्वांच्या पोटदुखीवर आपण उपचार करणार आहोत. सामान्य माणसाला त्याचा अधिकारही देणार आहोत, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

मागं अजित पवार म्हणाले होते की, दोनच झेंडे दिसत आहेत पण आता तिसरा झेंडापण आला आता काळजी करु नका. आपल्याला तिनही झेंडे घेऊन महाराष्ट्राचा झेंडा देशात सर्वात वर न्यायचा आहे. माझा महाराष्ट्रात देशात पहिल्या क्रमांकावर असेल हे आम्हाला करुन दाखवायचं आहे. त्यामुळं आम्हाला हा इतका मोठा प्रतिसाद मिळतो आहे, असंही ते म्हणाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790