नाशिक: सव्वा लाख नागरिकांना पाणीपट्टी देयके वाटप होणार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पाणीपट्टीची जेमतेम वसुली झाल्याने दिवाळीनंतर विविध कर विभागाकडून पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांकडे तगादा लावला जाणार असून, जवळपास सव्वा लाख नळजोडणी धारकांना येत्या आठ दिवसात पाणीपट्टीची देयके वाटप केली जाणार आहे.

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हवा असेल तर त्यासाठी महापालिकेने उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या स्पष्ट सूचना केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने घर व पाणीपट्टीकडे लक्ष केंद्रित केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी; गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

मागील सात महिन्यात घरपट्टीच्या माध्यमातून १३८ कोटी रुपये वसूल झाले. मागील वर्षाच्या तुलनेत ३२ कोटींहून अधिक घरपट्टी वसुली झाली आहे. घरपट्टी वसुलीसाठी २२५ कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

घरपट्टीची वसुली समाधानकारक असली तरी पाणीपट्टीची वसुली जेमतेम ३४ टक्के झाली आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी ७५ कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यापैकी २५ कोटी ६४ लाख रुपये वसुली झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कुंभाच्या गर्दीपूर्वी आपत्ती प्रतिसाद व्यवस्थेचा ‘ग्राउंड चेक’; घाटांची संयुक्त पाहणी

त्यामुळे दिवाळीनंतर करवसुलीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना नोटीस बजावली जाणार आहे. महापालिका हद्दीमध्ये २ लाख सात हजार ३९१ नळजोडणीधारक आहे. त्यापैकी एक लाख ८३ हजार नळजोडणीधारकांना देयके वाटप करण्यात आली. उर्वरित देयके येथे आठ दिवसात वाटप केले जाणार आहे. देयकांचे वाटप करण्यासाठी पंधरा दिवसांची मदत देण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  येवल्याच्या पैठणीचा राष्ट्रीय गौरव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी

“पाणीपट्टीची जेमतेम ३४ टक्के वसुली झाल्याने दिवाळीनंतर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. मुदतीच्या आत थकबाकी अदा न करणाऱ्या थकबाकीदारांवर देखील गुन्हा दाखल केला जाणार आहे.” – श्रीकांत पवार, उपायुक्त, विविध कर, महापालिका.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790