नाशिक: निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात निवडणुका पार पडतील याची दक्षता घ्या- राम मोहन मिश्रा

नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघात निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात निवडणुका पार पडतील, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने दक्षता घ्यावी. त्यासाठी आवश्यक तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना महाराष्ट्रासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी केली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज मिश्रा यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. यावेळी भारत निवडणूक आयोगाने विविध विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक, स्वीप साठीचे निरीक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा, नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे तसेच संबंधित मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

मिश्रा यांनी यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. संबंधित मतदारसंघाची स्थिती, तेथील मतदान केंद्रांची संख्या, त्याठिकाणी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि उपाययोजना, कायदा आणि सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कार्यवाही, मतदारांची जनजागृती आदी विषयावर मार्गदर्शन केले.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदारांच्या रांगा लागतात. त्याची पुरेशी व्यवस्था व्हावी तसेच मतदारांची गैरसोय होणार नाही, याची पुरेशी दक्षता घ्यावी. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करावे. निवडणूक विषयक यंत्रणेकडे आलेल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रचाराकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली.

हे ही वाचा:  नाशिक: सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ; शेल्टर २०२४ चे उद्घाटन

यावेळी, विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त निरीक्षक यांनीही विविध सूचना केल्या. जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेच्या तयारीची माहिती दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790