नाशिक: बकरी ईद पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल!

नाशिक (प्रतिनिधी): गुरुवारी (ता. २९) बकरी ईद असून या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे.

त्यानुसार दोन मार्ग या कालावधीत बंद राहतील, तर इतर पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली जाणार आहे.

गुरुवारी असा बदल केला आहे. त्यात त्र्यंबक पोलीस चौकी ते मायको सर्कलपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी जाण्या-येण्यास बंद करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:  दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

याबरोबरच गडकरी चौक ते मोडक सिग्नलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद राहणार आहे.

त्याचप्रमाणे मोडक सिग्नलपासून त्र्यंबक रस्त्याने जाणारी वाहतूक सीबीएस, अशोकस्तंभ, गंगापूरनाका सिग्नल ते जुना सिबीएस सिग्नलमार्गे जातील किंवा – मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, संदीप हॉटेल, चांडक सर्कल मायको सर्कलमार्गे जुना सीबीएस सिग्नलमार्गे त्र्यंबककड़े जातील.

तर मायको सर्कलकडून मोडक सिग्नलकडे येणारी वाहतूक ही मायको सर्कलकडून चांडक सर्कल, संदीप हॉटेल, गडकरी चौकमार्गे इतरत्र जातील किंवा जुना सिटीबी सिग्नल, एचडीएसी सर्कल, कॅनडा कॉर्नर, गंगापूर रोडमार्गे जातील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790