नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पांडवलेणी येथील बौद्ध स्मारकात मंगळवारी (दि. २४) बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अतिमहत्त्वाच्या दर्जाचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तिथे गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यासंदर्भात पोलिसांच्या वाहतूक विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
मंगळवारी (दि. २४) सकाळी ६ वाजेपासून
प्रवेश बंद मार्ग:
👉 क्लिक हॉटेल ते गरवारे टी पॉइंट या इंदिरानगर बाजूकडील सर्व्हिस रोडवरून येणारी व जाणारी वाहने
👉 फेम सिग्नल ते कलानगर- पाथर्डी गाव सर्कल, पाथर्डी फाटा, गरवारे टी पॉइंट मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी
👉 गरवारे टी पॉइंट ते पाथर्डी फाटा, पाथर्डी गाव सर्कल, कलानगर, फेम सिग्नल मार्गावर प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग:
👉 क्लिक हॉटेल, गरवारे टी पॉइंट, मुंबईकडे जाणारी सर्व वाहने क्लिक हॉटेल रॅम्पवरून मुंबईकडे
👉फेम सिग्नलकडून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना द्वारका सर्कलमार्गे रॅम्पवरून उड्डाणपुलावरून मुंबईकडे
👉 गरवारेकडून नाशिकरोडकडे जाणारी अवजड वाहने ओव्हरब्रीजवरून द्वारका सर्कल-फेम सिग्नलवरून नाशिकरोडकडे
👉 पाथर्डी गावाकडून गरवारे, मुंबईकडे जाणारी सर्व वाहने पाथर्डी फाटा, ताज बोगद्यामधून अंबड सर्व्हिसरोड, महिंद्रा शोरूम, सुदाल कंपनी, गरवारे टी पॉइंटकडून गौळाणेमार्गे मुंबईकडे
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790