नाशिक (प्रतिनिधी): उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य हृदयरोग उपचार रुग्णालय मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटने जगातील सर्वात लहान हृदय पंप ‘इम्पेला’चा वापर करून अत्यंत अवघड अँजिओप्लास्टी यशस्वी केली आहे. सदर कामगिरी वैद्यकीय क्षेत्रात मैलाचा दगड मानली जात आहे. नाशिकच्या रहिवासी 72 वर्षीय पार्वती अग्रवाल या ह्रदयविकाराने ग्रस्त होत्या. मात्र उपचारात जोखीम असल्याने यापूर्वी अनेक डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता.
ह्रदयविकाराने ग्रस्त पार्वती अग्रवाल यांची प्रकृती अचानक ढासळल्याने त्यांना मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या आपत्कालीन कक्षात भरती करण्यात आले. तिथे त्यांना तीव्र कोरोनरी सिंड्रोम (हृदयरोग) असल्याचे निदान झाले. शिवाय, अँजिओग्रामने हृदयाच्या सर्व प्रमुख धमन्यांमधील अडथळे दिसून आल्याने आंतरराष्ट्रीय हृदयरोग तज्ञ तथा मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. मनोज चोपडा यांनी इम्पेला हृदय पंपाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्याचा तात्काळ निर्णय घेतला. मॅग्नम हॉस्पिटलमधील तज्ञांच्या टीमने पार्वती अग्रवाल यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. सद्यस्थितीत श्रीमती अग्रवाल यांची प्रकृती ठणठणीत आहे.
या संदर्भात डॉ. मनोज चोपडा यांनी माहिती दिली की, कमजोर हृदय, धमनीतील अडथळे, वृद्धत्व, मधुमेह किंवा किडनी समस्या, हृदयनिकामी होण्याची मध्यम ते गंभीर लक्षणे असल्यास शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. अशा शस्त्रक्रियेत मोठी जोखीम असते. “प्रक्रियेपूर्वी इम्पेला पंप टाकून, आम्ही त्यांच्या कमकुवत हृदयाच्या पंपिंग कार्याला आधार देऊ शकलो आणि हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूसह सर्व प्रमुख अवयवांमध्ये सतत रक्त प्रवाह सुरु राहिला.”शस्त्रक्रियेदरम्यान इम्पेला हार्ट पंपचा वापर अपरिहार्य बनला होता. कारण “VA अनकपलिंग” ची अनेक उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे पार्वती अग्रवाल यांच्या हृदयाने क्वचितच रक्त पंप केले आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण अवयवांना बहुतेक रक्तपुरवठा हा इम्पेलाद्वारे झाला. डॉ. चोपडा म्हणतात, “इम्पेला हार्ट पंप नसता, तर माझ्या रुग्णावर अशाप्रकारे उच्च-जोखीमची शस्त्रक्रिया करता आली नसती. म्हणून त्यांचे हृदय कमकुवत असूनही त्यांचेवर जीवनदायी उपचार करणे शक्य झाले.
“मॅग्नम हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. खुशमन वैद्य सांगतात की, अलिकडच्या काळात रुग्णांमध्ये मोठी गुंतागुंत वाढली आहे. अनेक रुग्णांमध्ये ओपन-हार्ट शस्त्रक्रियेत मोठा धोका असल्याचे मानले जाते. अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये हृदय पंपाच्या सपोर्ट शिवाय अँजिओप्लास्टी करणे आव्हानात्मक असते,”
इम्पेला हार्ट पंपचे निर्माते ABIOMED चे एशिया-पॅसिफिक विभागाचे वैद्यकीय व्यवहार आणि उपचार विकास प्रमुख डॉ. कमलेश कोठावदे यांच्या माहितीनुसार, उपकरणाची सुरक्षितता आणि परिणामकारकता खूपच मजबूत आहे. “इम्पेला हार्ट पंप यूएस-एफडीएने मंजूर केला आहे आणि जगभरातील 170,000 हून अधिक रुग्णांना मदत केली आहे. हा पंप ओपन-हार्ट शस्त्रक्रियेची गरज न पडता तो मांडीच्या लहान पंक्चरद्वारे घातला जाऊ शकतो. शिवाय, इम्पेला वापरण्याचे फायदे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही वाढतात”
पार्वती अग्रवाल यांचे प्राण वाचल्याने त्यांच्यासह आणि अग्रवाल कुटुंबीयांनी मॅग्नम हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे. अग्रवाल परिवाराने सांगितले की, त्यांना आता खूप बरे वाटत आहे आणि वैद्यकीय पथकाने दिलेल्या सेवेबद्दल ते सदैव कृतज्ञ आहे.
मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट बद्दल: मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट हे एक प्रसिद्ध कार्डियाक हॉस्पिटल आहे. अत्याधुनिक सुविधांसह तेथील कुशल डॉक्टरांची टीम उच्च दर्जाची हृदयरोग सेवा प्रदान करण्यास कटिबद्ध आहे.