या रविवारी नाशिक- इंदूर रविवारी विशेष विमानसेवा !
नाशिक (प्रतिनिधी): स्टार एअरकडून रविवारी (दि. १८) नाशिक- इंदूरदरम्यान विशेष विमानसेवा दिली जाणार आहे. ही सेवा केवळ एकच दिवस उपलब्ध असली तरी, नियमित सेवेसाठी तर ही चाचपणी नाही ना असा सूरही उमटत आहे.
नाशिक विमानतळाहून यापूर्वी सुरू आणि कोरोनामध्ये स्थगित विविध शहरांसाठीच्या विमानसेवा पूर्ववत सुरू होत आहेत. ज्या शहरांसाठी एक सेवा उपलब्ध होती तेथे दोन विमानसेवा आता दिवसातून उपलब्ध होत असून बेळगाव, दिल्ली, अहमदाबाद या तीन शहरांचा यात समावेश आहे. आणखी काही नवी शहरे नाशिकला विमानसेवेने येत्या काळात यामुळे जोडलेली पहायला मिळतील असे सुचिन्ह सध्या आहेत.
विविध विमान कंपन्यांकडून नाशिकहून कोलकाता, चेन्नईंसारख्या शहरांशी हवाई कनेक्ट देण्यासंदर्भात काम सुरू आहे. लवकरच या सेवादेखील नाशिककरांना उपलब्ध होऊ शकतील. इंदूरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा : उडान योजनेंतर्गत इंदूर, भोपाळ या शहरांचाही नाशिकमधून विमानसेवेसाठी समावेश असला तरी अद्यापही या सेवा सुरू झालेल्या नाहीत.
नाशिक- सुरत आणि नाशिक-इंदूर येथील व्यापार कनेक्ट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या शहरांसाठी कधी सेवा सुरू होते याची प्रतीक्षा नाशिककर गेली काही वर्षे करत आहेत.
विशेष सेवेचे वेळापत्रक: रविवारी (दि. १८) १७.४० वाजता नाशिकहून टेकऑफ व १८.३० वाजता इंदूरला लँडिंग होईल. ही विशेष सेवा एका बाजुने असेल.