दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार : गायकवाड

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाइन घेण्याचे ठरवण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: १६ लाख, तर बारावीसाठी १५ लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १५ मार्चपासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहोचवली जाईल. अन्य मंडळांच्या परीक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790