नाशिक: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांचे निधन

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नगरपालिका ते महापालिका सलग सातवेळा निवडून येणाचा विक्रम नावावर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी सभापती आणि जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक उपाध्यक्ष उत्तमराव कांबळे (८४) यांचे गुरुवारी (दि. १८) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली मृत्यू

माजी नगरसेवक समीर (जॉय) कांबळे यांचे ते वडील होत. राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात कांबळे यांचा मोठा नावलौकिक होता.

नाशिक नगरपालिकेत १९६७ मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवकपदी निवडून आले होते. १९६९ मध्ये उपनगराध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. प्रशासकीय कारकीर्दीनंतर १९९२ मध्ये महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये १९९२ व १९९३ मध्ये ते सलग दोन वर्षे त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले. २००४ आणि २००५ मध्येही ते स्थायी समितीचे सभापती होते. नाशिकच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790