संगमनेर तालुक्यात सहावीतील विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला; चेहऱ्याला दुखापत, परिसरात खळबळ

नाशिक/संगमनेर। दि. १८ मार्च २०२६: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शाळेतून घरी परतणाऱ्या सहावीतील १२ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात हल्लेखोराने अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. या हल्ल्यात विद्यार्थिनीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूस सुमारे ७ टक्के भाजल्याची माहिती असून, तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतीत नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासह प्रयोगशीलता आवश्यक- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलने घरी जात असताना ओढ्याजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एका व्यक्तीने तिला अडवले आणि काही कळण्याआधीच त्याने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले.

हल्ल्यानंतर विद्यार्थिनीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक तत्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  येवला- मनमाड- मालेगाव रस्त्यावर 24 मार्चपासून रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत अवजड वाहतूक सुरू राहणार

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790