समृद्धीवर पुन्हा मृत्यूचं तांडव! १७ कामगारांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्याचे चौकशीचे आदेश

समृद्धी महामार्गावरील पुलाचे काम सुरू असताना शहापूर येथे ग्रेडर व लाँचर (क्रेन) कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मंगळवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पुलाचे काम सुरू असताना पुलावरूल गर्डरसह क्रेन कोसळून मोठा अपघात झाला. या घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाला असून ३ कामगार जखमी झाले आहेत.या जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की…:
शहापूरजवळ समृद्धी एक्सप्रेसचं काम सुरू होतं, त्यावेळ गर्डर कोसळून १७ लोकांचा मृत्यू झाला. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. सर्व अधिकारी, पालकमंत्री आणि त्या खात्याचे मंत्रिदेखील घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. स्वित्झरलँडची कंपनी या ठिकाणी काम करत होती. या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मृतांच्यानातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना झाला अपघात:
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.

आज पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एनडीआरएफ चे पथक याठिकाणी पोहचले असून बचाव कार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790