नाशिक (प्रतिनिधी): पोलीस उपआयुक्त परिमंडळ -1 कार्यक्षेत्रात गोदावरी प्रदुषण मुक्तीसाठी फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम (१) (२) अन्वये 05 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्याचे शहर पोलिस उप आयुक्त अमोल तांबे यांनी शासकीय आदेशान्वये कळविले आहे.
गोदावरी नदी प्रदुषण मुक्त असावी यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ‘हरितकुंभ’ संकल्पना तयार करण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्तालय परिमंडळ १ कार्यक्षेत्रातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापुर, आडगांव पोलीस ठाणे हद्दीत गोदावरी नदीचे पात्र आहे. या नदीपात्रात असणाऱ्या ठिकाणी नदी किनारी कपडे, भांडे, मोटार वाहन धुणे, जनावरे धुणे तसेच नदीपात्रात कचरा टाकणे, प्लास्टिकच्या पिशव्या टाकणे अथवा गोदावरी प्रदुषित होईल असे कृत्य करण्यास फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) अन्वये बंदी शहर पोलिस उप आयुक्त अमोल तांबे यांनी बंदी घातली आहे.
या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1960 या कायद्याच्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस उप आयुक्त तांबे यांनी शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.