राज्य शासनाच्या आदेशावरून इंग्लंड येथून नाशिकला आलेल्या प्रवाशांची पुन्हा चाचणी
नाशिक (प्रतिनिधी): २५ नोव्हेंबरपासून इंग्लंड मधून आलेल्या नाशिक शहरातील ४८ तर ग्रामीणमधील २० नागरिकांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत.
या आदेशामुळे जे लोक घरी क्वारंटाइन आहेत त्यांना तपासणीसाठी जावे लागणार आहे. इंग्लंड मध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आल्याने सगळ्या जगाला धास्ती भरली आहे. यामुळे तिकडून आलेल्या प्रवाशांची विशेष काळजी घेतली जात आहे. आधीच नियमानुसार त्यांच्या चाचण्या करून ती निगेटिव्ह आल्यावरच त्यांना घरी पाठवले होते. मात्र २४ तारखेला राज्य शासनाने पुन्हा चाचण्या करण्याचे आणि त्यांमध्ये काही संशयित आढळले तर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
विलगिकरण कक्षात ठेवलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा १४ दिवसांनी चाचणी करून ती निगेटिव्ह आल्यावर पुन्हा २४ तासात चाचणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.