बायोडिझेल पंपावर छापा; माजी आमदाराचा भाऊ चालवत होता हा पंप!
नाशिक (प्रतिनिधी): मालेगावमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या माजी आमदारांचा भाऊ व हा अनधिकृत बायोडिझेल पंप चालवत होता. यावर ग्रामीण पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे
नाशिक मालेगाव रस्त्यावर बिनधास्तपणे हा पंप सुरू होता. माजी आमदार रशीद शेख यांचा भाऊ व माजी आमदार आसिफ शेख यांचे काका जलील शेख हा अनधिकृत पंप चालवत होता. जलील शेखच्या मालकीच्या हॉटेलमागे पत्र्याच्या शेडमध्ये हा अनधिकृत डिझेल पंप उभारण्यात आला होता.
पंपावर मिळणाऱ्या डिझेल पेक्षा १५ ते २० रुपये कमी दराने बायोडिझेल विकला जात होता. पोलीसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी ही कारवाई केल्याचे समजते.
ज्यावेळी पोलीसांनी छापा टाकला, त्यावेळी २५ हजार लिटर बायो-डिझेलची टाकी व ५ हजाराच्या ३ टाक्या व त्यात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स होते. ते बायो-डिझेलसाठी वापरले जात होते. या कारवाईत पोलीसांनी सर्व साहित्य सील केले असून मालेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील वर्षी बायोडिझेलचा पंप स्थापन करून त्या नावाखाली इतर भेसळयुक्त इंधन विक्री करण्याचा सपाटा जिल्ह्यातील काही पंपचालकांनी सुरू केला होता. बायोडिझेलच्या नावाखाली मालेगाव तालुक्यात १८ ते २० पंप सुरू झाले होते. तेथे बायोडिझेलच्या नावाखाली इतर भेसळयुक्त इंधन विकले जात असल्याची पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनची तक्रार होती. जिल्हा प्रशासनाने एकाही बायोडिझेल पंपाला परवाना दिलेला नसतानाही त्या नावाखाली इंधनविक्री सुरू होती.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; रॅगिंग होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप
नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्रांवर खु’नाचा गुन्हा
चक्क साड्यांच्या बॉक्समधून सुरु होती गुटख्याची वाहतूक.. दोन जण अटकेत !